164 रुग्णांची नोंद : 139 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज 164 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सहा जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 88,528 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी चार वाजेपर्यंत शहरातील 164 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये शहराबाहेरील 4 रुग्णाचा समावेश आहे. तसेच शहरातील 6 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत शहरात 998 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 166 रुग्णांचाही समावेश आहे.
शुक्रवारी दिवसभरात शहरात 6 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील थेरगवा, निगडी, पिंपरी, भोसरी येथील चार रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील अहमदनगर व हिंजवडी येथील दोघांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 139 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 85213 इतकी झाली आहे.
तर दिवसभरात 2022 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अद्याप 836 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.