आसाममध्ये एनडीएफबीच्या ६ दहशतवाद्यांना अटक

कोक्राझार – आसाम राज्यातील क्रोकाझार जिल्ह्यात भारतीय लष्कराने आसाम पोलिसांसह राबवलेल्या संयुक्त कारवाईत एनडीएफबीच्या (नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड) ६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील रिपू या संरक्षित जंगलात ही मोहीम राबवली.

दरम्यान, सोमवार आणि मंगळवारदरम्यानच्या रात्री पोलिसांच्या गस्त पथकाला या भागात ६ व्यक्ती आढळून आल्या. यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना अटक करण्यात आली. या लोकांची चौकशी केली असता त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना सुरक्षा दलांनी पकडले. या ६ जणांकडून घटनास्थळावरून एक एम १६ अॅसॉल्ट रायफल, सहा ७.६५ मिमी पिस्टल्स, १२ मॅगॅझीन्स, दारूगोळा, औषधे, खाद्यपदार्थ आणि आणखी काही शस्त्रसामग्री आणि प्रशासकीय कागदपत्रे जप्त करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)