एकमेकांच्या जवळ गेल्यास सहा महिने कारावास

सिंगापूर – करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सिंगापूर देशाने सोशल डिस्टन्सिंगच्या संबंधातील निर्बंध अतिशय कडक केले असून एकमेकांपासून ठराविक अंतर न पाळणाऱ्या नागरिकांना आता सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा त्या सरकारने जाहीर केली आहे. सिंगापूरने शहरातील सर्व चित्रपट गृहे, मद्यपान गृहे आणि सोशल गॅदरिंगवर या आधीच बंदी घातली आहे.

करोनाला रोखण्यासाठी क्वारंटाईन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम जगभर पाळले जात आहेत. तथापि सिंगापूरमध्ये अजून नागरिकांना लॉकडाऊन अवस्थेत ठेवण्यात आलेले नसले तरी त्यांना एकमेकांपासून निर्धारित अंतर राखण्याच्या सूचनेचे मात्र काटेकोर पालन करावे लागत आहे.

दोन नागरिकांना एकमेकांपासून किमान एक मीटरचे अंतर राखावे अन्यथा त्यांना कारावासाच्या शिक्षेला सामोरे जाऊ लागते, अशी जाहीर सूचना त्या देशाच्या सरकारने आपल्या नागरिकांना केली आहे. सिंगापूरमध्ये सर्व प्रकारची दुकाने सुरू असली तरी दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी दुकानदारांवरच टाकण्यात आली असून त्याचे उल्लंघन झाल्यास दुकानदारांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.