न्यूयॉर्क – अमेरिकेत करोनाच्या प्रादुर्भावामुळे 6 महिन्यांच्या एका बाळाचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू होणारा हा सर्वात कमी वयाचा रुग्ण असल्याचे कनेक्टिकट प्रांताच्या गव्हर्नरनी सांगितले आहे.
या बाळाला रुग्णालयात आणले गेले, तेंव्हाच बाळाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. बाळाला शुद्धीवर आणता येऊ शकले नाही. त्याच रात्री बाळाला “कोविड-19’चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते, असे गव्हर्नर नेड लॅमोन्ट यांनी सांगितले.
ही घटना अत्यंत क्लेषदायक आहे. आतापर्यंत करोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी सर्वात लहान वयाच्या रुग्णाचा मृत्यू असावा. गेल्या आठवड्यात वर्षभरापेक्षा कमी वयाच्या मुलाच्या मृत्यूबाबत इलिनोइसच्या अधिकारी तपास करत होते. या मुलाचा मृत्यू करोनाची लागण झाल्यामुळे झाल्याचा संशय होता.
अमेरिकेमध्ये करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत साडे चार हजार जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्येच 2 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.