नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायायलयाच्या सहा न्यायाधिसांना स्वाईन फ्लूची बाधा झाली. त्यामुळे सरन्यायाधिश शरद बोबडे यांनी आपत्कलीान बैठक आयोजित केली. या समस्येमुळे शबरीमलासह घटनापीठापुढे सुरू असणाऱ्या दोन खटल्याच्या सुनावणी पुढे ढकलल्या जाणार आहेत.
वकीलांचे आरोग्य कायम रहावे म्हणून औषध उपलब्ध करून देण्याचे सर्वोच्च न्यायलयाने ठरवले आहे, असे एका सुनावणीवेळी न्या. डी. वाय, चंद्रचुड यांनी सांगितले. दरम्यान बैठकीत या साथीला रोखण्यासाठी बार असोसिएशन आणि त्याच्या अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, असे सरन्यायाधिशांनी सुचवले असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.
सर्वोच्च न्यायलय बार असोसिएशनची बैठक अध्यक्ष दुष्यंत दवे यांच्या नेतत्वाखाली पार पडली. अलीकडेच सर्वोच्च न्यायलयात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत काही परकीय सदस्यांना या विषाणूंची बाधा झाली होती. त्यामुळे ही साथ आल्याचे त्यांनी सांगितले. शबरीमला खटल्याची सुनावणी घेत असलेल्या नऊ सदस्यांच्या घटनापीठातील दोन न्यायधिशांना स्वाईन फ्ल्यू झाला आहे.
जर्मन माहिती तंत्रज्ञान कंपनी सॅपने त्यांच्या बंगळुरातील कार्यालयातील दोघांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यानंतर भारतातील सर्व कार्यालये निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवली होती. त्यापाठोपाठ ही घटना घडली आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे नहमीच्या तापासारखी असतात. ताप, खोकला, नाक गळने, घसा खवखवणे, आणि अंगदुखी ही त्याची लक्षणे असतात. तापमानात घट झाली की हा विषाणू आपले हातपाय पसरतो, असे आढळून आले आहे.