न्हावरे/शिक्रापूर/मांडवगण फराटा/रांजणगाव – शिरूर तालुक्यात बुधवारी (दि. 27) दिवसभरात शिरूर तालुक्यात शिक्रापूर, न्हावरेत प्रत्येकी दोन तर मांडवगण आणि रांजणगाव एमआडीसीतील प्रत्येकी एक असा एकूण सहा जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे शिरूर तालुक्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण बाधितांची संख्या 22वर पोहोचली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात करोना पाय घट्ट रोवत असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे.