कोयना धरणाचे सहा दरवाजे उघडले; 73 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने धरणाच्या सहा वक्र दरवाजे आठ फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात 73 हजार 063 कयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी उचलणार असल्याचे माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

सध्‍या कोयना धरणात 104.60 टीएमसी पाणीसाठा असून पाणी पातळी 2163 फूट झाले आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने धरणात 80 हजार 557 कयुसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता धरणाचे दरवाजे आठ फुटांनी उचलून कोयना नदीत 73 हजार 63 कयुसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे यामुळे कोयना नदी काठच्या गावांना कोयना धरण व्यवस्थापनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. गेल्या बारा तासात महाबळेश्वर येथे 96 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर कोयना नगर येथे 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)