टॉवेल कंपनी विरोधात सहा दिवसांपासून आंदोलन

थकीत बिल न दिल्याने कामगार आक्रमक

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या टॉवेल इंजिनिअरिंग इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीकडे कामाचे थकीत बिल न मिळाल्याने बारामती येथील सुनिता टुर्णकी प्रोजेक्‍ट लिमिटेडच्या परिवाराने सहा दिवसांपासून धरणे आंदोलन टॉवेल इंजिनीरिंग कार्यालयाच्या समोर सुरू केले आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघाला नाही.

टॉवेल इंजीनियरिंग इंटरनॅशनल लिमिटेडकडे सुनिता टुर्नकी प्रोजेक्‍ट कर्नाटकात एक काम केले होते. मात्र, या बिलाची रक्‍कम अद्यापही मिळाली नसल्यामुळे सुनिता टुर्नकी परिवार आर्थिक संकटात सापडला आहे. कामगारांच्या हाती पैसा नसल्यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे. केलेल्या कामाचे बिल लवकर द्यावे, यासाठी अनेकवेळा लेखी तोंडी मागण्या टॉवेल इंजिनिअरिंग इंटरनॅशनल लिमिटेडकडे सुनीताने केल्या. मात्र, वेगळेच कारण पुढे करून मूळ बिल देण्याचा विषय टाळला जात आहे.

हे आंदोलन एका कंपनीचे असल्यामुळे इंदापूर पोलिसांनी या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. परंतु टॉवेल इंजिनिअरिंग इंटरनॅशनल यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सहा दिवसांपासून थेट टॉवेल इंजिनिअरिंगच्या दारात धरणे आंदोलन सुरू आहे.

सुनिता टुर्नकी प्रोजेक्‍टचे दयानंद पेठकर म्हणाले की, आमच्या कंपनीने चोख पद्धतीने काम करून केलेल्या कामाचे दाम बिल टॉवेल इंजीनियरिंग देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. आमच्या कंपनीमध्ये शेकडो महिला, पुरुष आहेत. हे बिल आम्हाला न प्राप्त झाल्यामुळे आमच्या परिवारावर आर्थिक संकट ओढावले आहे. तरी आंतराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या टॉवेल इंजीनिअरिंग बिल दिले नाही.

टॉवेल इंजिनीअरिंगमध्ये काम पाहणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपासून खोटी आश्‍वासने देऊन आमची फसवणूक चालवली आहे आमची थकीत रक्‍कम 75, 83, 082.40 इतकी आहे. दरम्यान, आमचे थकलेले बिल जोपर्यंत मिळणार नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा दयानंद पेठकर यांनी दिली. टॉवेल इंटरनॅशनल कंपनीचे लोणी देवकर विभागाचे युनिट प्रमुख संजय सूर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु भ्रमणध्वनी बंद असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)