तीन तास उभे राहून काम करणे मात्र फायदेशीर
न्यूयॉर्क : आधुनिक काळामध्ये व्यवसायामध्ये स्पर्धा वाढली त्याप्रमाणे कामाच्या पद्धतही बदलत गेल्या आहेत. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जास्त काळ काम करणे सर्वांनाच महत्त्वाचे वाटत आहे, पण आता नुकत्याच झालेल्या संशोधनाप्रमाणे जर तुम्ही सतत आठ तास बसून काम करत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे मात्र जर तुम्ही दिवसभरातल्या आपल्या कामापैकी तीन तास जर उभे राहून काम करत असाल तर ते मात्र फायदेशीर आहे.
दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्या लोकांच्या मनावरही त्याचा परिणाम होत आहे, त्यांची स्मृती कमजोर होत असून इतरही शारीरिक आजार होण्याची शक्यता वाढली आहे. सतत बैठे काम करण्याची जबाबदारी असणाऱ्या लोकांनी जर आठ तासांपैकी तीन तास उभे राहून काम केले तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. असे काम केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. त्याशिवाय अशा लोकांना थकवा कमी येतो असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
पार्क येथील ग्लोबल वेल बीइंग लीड या संस्थेचे प्रमुख मायलॉर्ड वोवेल त्यांनी दिलेला माहितीप्रमाणे, सतत एकाच जागा बसून काम करणाऱ्यांच्या मनात नकारात्मक विचार मोठ्या प्रमाणात येऊ शकतात, तसेच त्यांना मानसिक थकवा ही जास्त प्रमाणात जाणवू शकतो. एका ठिकाणी दीर्घकाळ बसून काम केल्यामुळे रक्ताभिसरणावरही परिणाम होतो अशा व्यक्तींच्या पायावरही परिणाम होऊ शकतो आणि अपंगत्व येण्याचाही धोका आहे. एका जागी बसून काम करणाऱ्या लोकांनी प्रत्येक अर्ध्या तासानंतर उठून दोन मिनिटे जर फेरफटका मारला तर ते सुद्धा त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.