अंदमान समुद्रात “एसआयटीएमईएक्‍स-20′ त्रिपक्षीय सागरी कवायती

मुंबई – स्वदेशी बनावटीची “एएसडब्ल्यू’ कॉर्वेट कामोर्ता आणि कॉर्वेट करमुक क्षेपणास्त्र यांच्यासह भारतीय नौदलाची जहाजे अंदमान समुद्रात होत असलेल्या “एसआयटीएमईएक्‍स -20′ या भारत, सिंगापूर आणि थायलंड त्रिपक्षीय सागरी कवायतीत भाग घेत आहेत.

भारतीय नौदलाने यजमानपद भूषवलेली पहिली “एसआयटीएमईएक्‍स’ कवायत सप्टेंबर 2019 मध्ये पोर्ट ब्लेअर जवळ आयोजित करण्यात आली होती. भारतीय नौदल, सिंगापुर नौदल आणि थाई नौदलात परस्पर आंतर-परिचालन क्षमता वाढवण्यासाठी या सागरी युद्धसरावाचे आयोजन केले जाते. 2020 ची ही कवायत सिंगापूर नौदल आयोजित करत आहे.

कोविड 19 ची साथ लक्षात घेऊन ही कवायत “विना स्पर्श, केवळ समुद्रात’ होत असून तीन मैत्रीपूर्ण नौदले आणि सागरी शेजार्यांमधील समुद्री क्षेत्रात वाढता समन्वय आणि सहकार्य राखण्यासाठी आयोजित केली गेली.

शनिवार आणि रविवार (दि. 21 आणि 22 नोव्हेंबर) या दोन दिवसांच्या या सागरी कवायतीत तिन्ही नौदल नौदलातील डावपेच, पृष्ठभागावरील युद्ध सराव आणि शस्त्रास्त्र गोळीबारासह विविध सरावांमध्ये सहभागी झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.