शेतकऱ्यांचे 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट करणार : अर्थमंत्री

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 रालोआ सरकार दुप्पट करेल, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.

आपल्या अंदाजपत्रकीय भाषणात सीतारामन म्हणाल्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यास आमचे सरकार बांधील आहे, या अर्थ संकल्पाचा उद्देश नागरिकांचे उत्पन्न वाढवून त्यांची क्रयशक्‍ती वाढवण्याचा आहे. कृषी बाजारपेठ मुक्त केली पाहीजे. कृषीक्षेत्र अधिक स्पर्धात्मक बनवले पाहिजे. शेतीपुरक उद्यग वाढवले पाहिजेत. परवडणअरी पिके आणि अधिक तंत्रज्ञानाची शेतीसाठी गरज आहे, असे ते म्हणाले.

ऍग्रिकल्चरल लॅंड लिझिंग कायदा 2016, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड लाईव्ह सॉक मार्केटींग ऍक्‍ट 2017 यांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला प्रोत्साहन देईल, असे त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा एवं उथ्थान महाअभियानांतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जेवरील पंप देण्यात येतील. शेतीमालाच्या वेगवान वाहतुकीसाठी रेल्वे पीपीपी योजनेतून किसार रेल्वे उभारेल. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रांतंर्गत मार्गावर किसान उडान सुरू करण्यात येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.