सीताराम येचुरी यांच्या मुलाचे करोनामुळे निधन

नवी दिल्ली – सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. आज सकाळी गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीताराम येचुरी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सीताराम येचुरी म्हणाले, मला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की माझा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ज्यांनी आम्हाला एक आशा दिली, ज्यांनी त्याच्यावर उपचार केले त्या डॉक्टरांचे, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दोन आठवड्यांपूर्नी आशिष येचुरी यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आशिष येचुरी एक पत्रकार होते, ते दिल्लीतील एका प्रसिद्ध वृत्तपत्रात सीनिअर कॉपी एडिटर म्हणून काम करत होते. वयाच्या ३४व्या वर्षी करोनामुळे त्यांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.