कोलोंबो- श्रीलंकेतल्या सीता या मंदिराच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेच्या मुखपृष्ठाचे अनावरण आज श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धेना यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीलंकेतील नुवारा एलिया या गावामध्ये झालेल्या समारंभात पंतप्रधान गुणवर्धेना यांच्या हस्ते या मंदिराची पायाभरणी देखील करण्यात आली.
रामायणामध्ये उल्लेख असलेली असोक वाटिका येथेच होती, असे मानण्यात येते आहे. येथेच सीतेचे मंदिर साकारले जाणार असून डबघाईला आलेल्या श्रीलंकेच्या अर्थकारणाला सावरण्यासाठी या मंदिरामुळे श्रीलंकेतल्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. मंदिराच्या भूमिपूजनाच्या समारंभाला भारतीय उच्चायुक्त गोपाल बागलेय आणि अन्य बारतीय उच्चाधिकारी उपस्थित होते.
गुणवर्धेना यांनी या प्रसंगी मंदिराच्या आवारात होणाऱ्या ध्यान केंद्राची पायाभरणी देखील केली. मंदिरासाठीच्या सुविधांचा भाग म्हणून हे ध्यान केंद्र उभारण्यात येणार आहे. भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा या केंद्रातून केल्या जाणार आहेत.
रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवल्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे. या वनातील अशोक वृक्षाच्या छायेमधअये सीतेचा निवास असायचा म्हणून या वाटिकेला अशोक वाटिका असे नाव प्राप्त झाले होते.
श्रीलंकेत यावर्षी मार्च महिन्यात 1.25 लाख पर्यटक आले होते. त्यामध्ये भारतीय आणि रशियाच्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. पर्यटन हा श्रीलंकेसाठी महत्वाचा उत्पन्न स्रोत आहे.