“तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा…”

प्रवीण तरडेच्या त्या पोस्टचे सोशलवर कौतुक

मुंबई – वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’  नेहमीच आपल्या फेसबुक पोस्टद्वारे चाहत्यांची मने जिकंत असतो.   सध्या मराठी चित्रपट सृष्टीतलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रवीण विठ्ठल तरडे यांना ओळखले जाते. नुकतेच त्यांनी सोशलवर त्याच्या मुलाबरोबर फोटो शेअर केला आहे.  

Posted by Pravin Vitthal Tarde on Tuesday, February 2, 2021

 

या पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये त्यांचा मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याचसोबत एक खूप चांगली पोस्ट लिहिली आहे. या पोस्टचे कौतुक सर्वत्र होत आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी  लिहिले आहे की, मुलांना ट्रिपला “ थंड हवेच्या “ ठिकाणी जरूर न्या .. पण आपल्या बापजाद्यांनी जिथं त्यांचं “गरम रक्त”सांडलं त्या गडकिल्ल्यांवर न्यायला विसरू नका .. तिथं बसून त्यांना शिवचरित्र वाचून दाखवा… आजची संध्याकाळ सिंहगडावर…

दरम्यान त्यांचा या पोस्टला लाखोंच्या घरात लाईक मिळाले असून सध्या सोशल मीडियावर  त्यांची ही पोस्ट सातत्याने चर्चेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.