साहेब! कष्टाने पिकवलेलं पीक फुकट गेलं; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

खा. शरद पवार यांची गाडी थांबवून शेतकऱ्यांनी मांडली व्यथा 

काटोल: विदर्भातील अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आज काटोल तालुक्यात दौरा करत आहेत दाखल झाले आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांची गाडी रस्त्यात थांबवून शेतकऱ्यांनी सोबत आणलेली खराब पिके त्यांना दाखवली. साहेब! कष्टाने पिकवलेले पीक फुकट चालले आहे, अशी व्यथा त्यांनी पवारांसमोर मांडली.

शरद पवार यांनी आज नागपूर मधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. यावेळी सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, कोणी पाहणी करायला आले नाही, पिकाला भाव नाही, अशा व्यथा हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मांडल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here