२०२५ मध्ये इंडियन सिनेमातील स्टार्स असलेल्या कलाकरांचे सिनेमे रिलीज होणार आहेत. सिनेमांचे रेटींग देणाऱ्या आयएमडीबीने याबाबत माहिती दिली आहे. यावर्षीच्या २० सिनेमांची यादी या साईटवर अपलोड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांना त्यांच्या स्टार्सचे सिनेमे कधी येणार याची उत्सुकता लागलेली होती. या लिस्टमध्ये नवे सिनेमे आहेत, तर काही यापूर्वी आलेल्या सिनेमांचे सिक्कल असल्याचे लिस्टवरून दिसते.
बॉलीवूड, दाक्षिणात्य अशा दोन्ही सिनेसृष्टीतील अनेक सिनेमे आहेत ज्याची चाहते आतुरतेने वाट बघत होते. २०२५ च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित इंडियन सिनेमांची लिस्ट आली असून जगभरातून IMDb ने दर महिन्याला येणाऱ्या २५ कोटींहून अधिक पेज व्ह्यूजनुसार सिनेमांची क्रमवारी निश्चित केली आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर भाई जान सलमान खानचा सिंकदर आहे. दुसऱ्या स्थानी केजीएफ फेम यशचा टॅाक्सिक सिनेमा आहे, तर तिसऱ्या स्थानावर रजनीकांत यांचा कुली सिनेमा आहे. तसेच चौथ्या स्थानावर हाऊसफुल्ल ५ आणि पाचव्या स्थानावर टायगर श्रॅाफचा बागी २ सिनेमाचा नंबर लागतो.
ही आहे IMDB च्या क्रमवारीनुसारची लिस्ट
१ सिकंदर
२. टॉक्सिक
३. कूली
४. हाऊसफुल ५
५. बाग़ी ४
६. राजा साब
७. वॉर २
८. L2: एंपुरान
९. देवा
१०. छावा
११. कन्नप्पा
१२. रेट्रो
१३. ठग लाईफ
१४. जाट
१५. स्काय फोर्स
१६. सितारे जमीन पर
१७. थामा
१८. कंतारा ए लीजंड: चॅप्टर १
१९. अल्फा
२०. थांडेल