पुणे: गेल्या आठवड्यात राज्यात विविध भागांत अतिवृष्टीचा तडाखा दिल्यानंतर थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा आगमनाची चाहुल दिली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अंदाजे अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने पुण्याची वाट लावली. अक्षरशः पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. कोथरूड, कर्वे पुतळा चौक परिसर जंगली महाराज रोड आणि सिंहगड रोडवर पाणी तुंबल्याने वाहन चालकांचे चांगलेच हाल झाले. दुचाकी वाहने निम्मी पाण्याखाली गेली आहेत.
हे वाचा