पुणे – सिंहगड पोलिसांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका तरुणास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची सात वाहने हस्तगत करण्यात आली. यास वाहनांची किंमत 1 लाख 80 हजार इतकी आहे. संबंधीत आरोपी हा सराईत वाहन चोर आहे. ओळखीच्या व्यक्तींकडून पैसे ऊधार घेऊन त्या बदल्यात तो चोरीची वाहने त्यांना देत होता.
महेश ऊर्फ मायकल नवनाथ कांबळे (25, घंदा-ड्रायव्हर रा. गल्ली नं. थिटे वस्ती, बैंक ऑफ बडोदाच्या पाठिमागे, खराडी ) असे अटक आरोपीचे नाव आहे. वाहन चोरीस प्रतिबंध करण्यासाठी सिंहगड पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. यावेळी सराईत वाहन चोर कांबळे हा चोरीचा दुचाकी घेऊन नवले ब्रिज जवळ येणार असल्याची खबर पोलीस अंमलदार शंकर कुंभार व उज्जवल मोकाशी यांना मिळाली होती.
दरम्यान परिसरात नाकांबदी केली असता, कांबळे हा दुचाकी घेऊन येताना दिसला. त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने ताब्यात असलेली दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्याच्याकडील अधिक चौकशीत त्याने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतून पाच, लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतुन एक व तोफखाना पोलीस स्टेशन (अहमदनगर) येथुन एक दुचाकी वाहन चोरल्याची कबुली दिली. ही सर्व चोरीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच कांबळेवर चंदनगर पोलीस ठाणेत वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मच्छिद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलिस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार,उजवल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगे पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, धनाजी धोत्रे, निलेश कुलथे, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांचे पथकाने केली आहे.