सिंहगड कॉलेज, भारती विद्यापीठ संघाचे विजय

शिअरफोर्स आंतर महाविद्यालयीन स्पोर्टस्‌ लीग

पुणे : सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्‍चर या संघांनी आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस्‌ लीगमधील फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

ही स्पर्धा वानवडी येथील एसआरपीएफ मैदानावर विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज आर्किटेक्‍चरच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर संघाने अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर संघावर 2-0 ने मात केली.

यात लढतीच्या 13 व्या मिनिटाला जयंत कापसेने गोल करून सिंहगड कॉलेजला आघाडी मिळवून दिली. तर 14 व्या मिनिटाला बोनी पटेलने गोल करून सिंहगड कॉलेजची आघाडी 2-0 ने वाढविली. यानंतर दिनाक मोडोकच्या (3 मि.) एकमेव गोलच्या जोरावर भारती विद्यापीठ संघाने अंजूम इस्लाम कळसेकर कॉलेजवर 1-0 ने मात केली.

दुसऱ्या सामन्यात हर्ष पांडेच्या हॅटट्रिकच्या जोरावर डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर संघाने श्री शिवाजी मराठी सोसायटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर संघावर 5-0 ने मात केली. यात हर्ष पांडेने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मिनिटाला गोल केले. ऋषभ खैरे (5 मि.) आणि मेहुल अगरवाल (7 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून त्याला चांगली साथ दिली.

निकाल – मुले – पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर 1 (मिहीर कुलकर्णी) वि. वि. बीकेपीएस 0. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, आकुर्डी 2 (दोन्ही गोल्स सौरभ) वि. वि. ब्रिक्‍स स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर 0. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर 1 – (अनिकेत) वि. वि. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, अम्बी 0. डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, लोहगाव 3 (तीन गोल्स सिद्धान्त) वि. वि. इंदिरा कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर 0.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.