“सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्‍ती’ उपक्रम; 2.3 टन प्लॅस्टिक संकलित

पिंपरी – देशामध्ये सुरू असलेल्या “सिंगल यूज प्लॅस्टिक मुक्ती’ उपक्रमातंर्गत बुधवारी महापालिकेच्या वतीने शहरात घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 2.3 टन प्लॅस्टिक संकलित करण्यात आले. या मोहिमेत सुमारे चार लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते.

महापालिकेतर्फे 32 प्रभागांमध्ये 37 संकलन केंद्र स्थापन करून नुकतीच प्लॅस्टिक संकलन मोहीम घेण्यात आली. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. तसेच, नागरिकांना स्वच्छता आणि प्लॅस्टिक बंदी अभियानाचे महत्त्व सांगण्यासाठी विशेष संमेलन आयोजित केले गेले. शहरातील पवना नदीच्या साफसफाई मोहिमेत शहरातील 200 महाविद्यालयातील तसेच एक हजार राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. शहरातील 26 घाटांवर प्लॅस्टिक कचरा श्रमदान करण्यात आले. त्यामध्ये सुमारे 40 किलो प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. शहरातील सर्व रेल्वे स्थानक, चापेकर चौक (चिंचवड), पिंपरी आणि भोसरी भाजी मंडई येथे जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. तसेच, नागरिकांना स्वच्छता आणि प्लॅस्टिक बंदी अभियानाचे महत्त्व सांगण्यासाठी विशेष संमेलन आयोजित केले होते.

विविध स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक मंच, पोलीस मित्र मंडळ, महाराष्ट्र पोलीस, रेल्वे अधिकारी तसेच टेक महिंद्रा, आयबीएम आदी कॉर्पोरेट संस्थांचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी पथनाट्ये घेण्यात आली. बीव्हीजी इंडिया, मारू इकोबाग यांनी सीएसआर भागीदारीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये प्लॅस्टिकच्या मोबदल्यात सुमारे एक हजार कापडी पिशव्या वितरित केल्या. “प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन’ या कार्यक्रमातंर्गत 500 कचरावेचकांना छत्री, ग्लोव्हज, पाण्याची बाटली, जाकीट आदी सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. तसेच, त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.