Singham Again OTT Release | बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवण्यास अपयशी ठरला. कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ सोबत या चित्रपटाची टक्कर होणे हे सिंघम अगेनला महागात पडले. आता हा चित्रपट ओटीटीवर तुम्ही घर बसल्या पाहू शकता.
‘सिंघम अगेन’ 13 डिसेंबर रोजी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रसारित झाला आहे, परंतु तो पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. Filmibeat च्या रिपोर्टनुसार, हा सिनेमा 27 डिसेंबरला OTT वर मोफत पाहता येऊ शकतो. या चित्रपटाने आतापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 247.78 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची जगभरातील कमाई 372.38 कोटींवर पोहोचली आहे.
यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 असे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. अजय देवगण स्टारर सिंघम अगेन बद्दल बोलायचे झाले तर, 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मोठ्या पडद्यावर पोलिस अधिकारी बाजीराव सिंघमचे पुनरागमन झाले.
यात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांच्या भूमिका आहेत. यातील अर्जुनचा अभिनय लोकांना खूप आवडला. यात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.
हेही वाचा:
राधिका आपटे झाली आई; फोटो शेअर करत दाखवली बाळाची पहिली झलक