बॉलीवूडमध्ये सध्या अनेक सेलेब्सच्या घरी लहान मुलांची किलकील ऐकू येत आहे. बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूरने नुकताच मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर आता गायिका हर्षदीप कौरही आई झाली आहे. तिनेही एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याबाबत खुद्द हर्षदीपने आपल्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे.
हर्षदीप कौरने मंगळवार, दि. 2 मार्च रोजी मुलाला जन्म दिला. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की, एक छोटासा स्वर्ग आताच पृथ्वीवर उतरला आहे आणि आम्ही आई-बाबा झालो आहे. आमचा ज्युनियर सिंह आला आहे आणि आम्ही आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हर्षदीपने आपल्या चाहत्यांना गुड न्यूज सांगितली होती. त्यावेळी तिने एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, या गोंडस बाळाला पाहण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. हा माझा अर्धा अंश आहे आणि अर्धा त्याचा. ज्याला मी सर्वाधिक प्रेम करते. ज्युनियर कौर/सिंह लवकरच मार्च-2012मध्ये येणार आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे.
बॉलीवूडमधील आघाडीच्या गायिकांपैकी हर्षदीप ही एक प्रसिद्ध गायिका आहे. त्यांनी अनेक हिट गाणे गायली आहे. हर्षदीपला “कटिया करूं’, “दिलबरो’, “नच दे सारे’, “जालिमा’ यासारखी अनेक हिट गाणे दिली आहे. तसेच त्या अनेक रियलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारल्या आहेत. हर्षदीपने 2015मध्ये मनकीत सिंहसोबत विवाह केला होता.