आशा भोसले यांना सॅल्फर्ड विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान, शेअर केले फोटो

मुंबई – आपल्या आवाजाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आजवर त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांना इंग्लंडच्या सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. आशाताईंनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

What an honour???

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle) on

 

View this post on Instagram

 

Preparing for my PhD from the university of Salford

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle) on

दरम्यान, ‘सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी स्वीकारताना’, असं कॅप्शन देऊन त्यांनी त्यांचे फोटो शेअर केले आहेत. आशाताईंनी आजपर्यंत बरीच गाणी गायली आहेत आणि आजही ही सगळी गाणी लोकप्रिय आहेत. यामध्ये ‘पर्दे मे रेहने दो’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’ यांसारखी विविध गाणी सुपरहिट ठरली होती. त्यांना २००० साली दादासाहेब फाळके पुरस्कार आणि २००८ साली पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.