गायक अदनान सामीला 50 लाखांचा दंड

मुंबई : गायक अदनान सामीला 50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2003 मध्ये अदनान सामी याच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व असताना त्याने मुंबईत फ्लॅट आणि पार्किंगची जागा विकत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. याच प्रकरणी त्यांना हा दंड ठोठावण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

अदनान सामी यांना याच प्रकरणात यापुर्वी ईडीने त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु, 12 सप्टेंबर रोजी लवादने ईडीचे आदेश फेटाळून लावले होते. 2003 मध्ये अदनान सामी याने मुंबईत 8 फ्लॅट आणि 5 पार्किंगच्या जागा विकत घेतल्या होत्या. त्यावेळी त्याच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व होते. परदेशी नागरिकांना अशा प्रकरणात ही माहिती आरबीआयला देणे बंधनकारक आहे. दरम्यान, त्याने खरेदी केलेल्या या संपत्तीची माहिती आरबीआयला दिली नव्हती त्यामुळे फॉरेन एक्‍सचेंज मॅनेजमेंट ऍक्‍ट या अंतर्गत 2010 मध्ये ईडीने त्याला 20 लाखाचा दंड ठोठावत संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला होता. या विरोधात सामीने अपीलेट ट्राब्युनलमध्ये दाद मागितली होती. त्यावरचा निर्णय आता समोर आला आहे. या निर्णयांतर्गत अदनान सामीने कोणतेही परकीय चलन वापरले नाही तसेच परदेशी नागरिकास लावण्यात येणारा करही त्याने भरला होता त्यामुळे देशाच्या कोणत्याही संपत्तीचे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, ईडीने लावलेल्या 20 लाखांच्या दंडाची रक्‍कमेत वाढ करून ती 50 लाखांपर्यंत करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×