संरक्षण सहकार्य बळकट करण्याबाबत सिंगापूरशी सहमती

सिंगापूर : भारत आणि सिंगापूर यांच्या संरक्षण दलांमध्ये संयुक्त युद्धसरावासाठी परस्परांशी वाढलेल्या संपर्काबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली. त्यावेळी दोन्ही देशांमधल संरक्षण सहकार्य एका वेगळ्या उंचीवर नेण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

भारतासाठी आशिया प्रशांत क्षेत्र म्हणजे सुरक्षित समुद्रांच्या माध्यमातून जोडलेला, एकात्मिक व्यापार असलेला आणि असियान देशांमध्ये समन्वय निर्माण करणारा खुला, समावेशक आणि स्थैर्य असलेला प्रदेश आहे. यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. राजनाथ सिंह यांच्या दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्याच्या समारोपापूर्वी ते आज भारत आणि सिंगापूर यांच्या संरक्षणमंत्र्याच्या चौथ्या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.