Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य शोकाकुल झाले आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगच्या वेळी झालेल्या या अपघातात अजित पवार (Ajit Pawar ) यांच्यासह विमानातील इतर चार जणांचाही मृत्यू झाला.दरम्यान, तपासात समोर आलेले प्राथमिक खुलासे अतिशय धक्कादायक आहेत. अजित पवार ज्या Learjet 45 मॉडेलच्या चार्टर्ड विमानात (VT-SSK) बसले होते, त्याबाबत अमेरिकेच्या NTSB ने यापूर्वीच लँडिंग गिअरमध्ये दोष असल्याचा इशारा दिला होता. तातडीने तपासणीचे आदेश दिले होते. तरीही त्याच विमानाचा वापर करण्यात आला, ज्यामुळे विमान कंपनीच्या सुरक्षितता प्रोटोकॉलवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.अपघाताच्या वेळी बारामतीत कमालीचे दाट धुके होते. बारामतीसारख्या छोट्या विमानतळावर ILS (Instrument Landing System) उपलब्ध नसल्याने वैमानिकाला केवळ दृश्यमानता आधारावर लँडिंग करावे लागते. धुक्यामुळे धावपट्टी दिसत नसल्याने वैमानिकाने पहिल्या प्रयत्नात लँडिंग सोडले आणि आकाशात घिरट्या घालून दुसऱ्यांदा प्रयत्न केला. मात्र, जवळपास १०० फूट उंचीवर असतानाच विमानाचे संतुलन बिघडले आणि ते रनवेपासून बाजूच्या जमिनीवर आदळले. ajit pawar plane crash आदळताच भीषण स्फोट झाला आणि आग लागली, ज्यामुळे मदतीची कोणतीही संधी उरली नाही. अपघाताच्या काही सेकंद आधी वैमानिकाने MAYDAY कॉल जारी केला होता, ज्याचा अर्थ अत्यंत आणीबाणीची स्थिती असते. यावरून वैमानिकाला तांत्रिक बिघाड किंवा नियंत्रण गमावल्याची जाणीव झाली होती, पण विमान सावरता आले नाही. बारामतीचा रनवे ‘टेबल टॉप’ प्रकारचा असल्याने अशा परिस्थितीत अचूक लँडिंगसाठी अत्यंत सावधगिरी आणि अचूकता आवश्यक असते. या अपघाताची DGCA आणि AAIB मार्फत सखोल चौकशी सुरू झाली आहे. राज्य सरकारने ३ दिवसांचा राजकीय शोक घोषित केला असून, अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. या दु:खद घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा आघात बसला आहे.