सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्या होणार उद्‌घाटन

मुंबई: कोकणातील सिंधुदुर्ग येथील विमानतळाचे 5 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. 520 कोटी रूपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल अशी माहिती राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

हा विमानतळ तारर्कली या सागरी पर्यटन केंद्रापासून केवळ 20 किमी अंतरावर असून ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून तो विकसित करण्यात आला आहे. राज्यात सध्या तीन आंतरराष्ट्रीय आणि 13 डोमेस्टिक विमानतळे आहेत. राज्य सरकारने या जिल्ह्यात फिशिंग इंडस्ट्री आणि हॉर्टिकल्चर कार्गो हब सुरू करण्याचाही निर्णय घेतल्याची माहिती केसरकर यांनी दिली. त्यासाठी राज्य सरकार 65 कोटी रूपये खर्च करणार आहे असेही त्यांनी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)