क्वालालंपूर : भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने गतवर्षीचे अपयश धुऊन काढण्यासाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. तिने येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील उप-उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिंधूने देखील जपानच्या अया ओहोरीचा 21-10,21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ओहोरीवर सिंधूचा हा 9 वा विजय ठरला.
ऑलिम्पिक रजतपदक विजेत्या सायनाने उपउपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला. 39 मिनिटात तिने यंगचा 25-23, 21-12 असा
पराभव केला.
दक्षिण कोरियाच्या खेळाडूला सायनाने प्रथमच परभूत केले आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत यंगने सायनाचा पराभव केला होता, आज सायनाने त्या पराभवाची परतफेड केली. उपांत्यपूर्व फेरीत आता सायनाचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे.
बुधवारी सायनाची सहकारी व भारताची अव्वल खेळाडू पी. व्ही. सिंधूने देखील या स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. आज सायनाने आक्रमक खेळ करताना सातत्याने येत असलेल्या अपयशावर मात केली.