मुख्यमंत्र्यांनी हटवली “सिंहासन खुर्ची’

उपस्थितांनी केले उद्धव ठाकरेंचे कौतुक

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तुमचे मत काहीही असो; मात्र हा माणूस एक सर्वसामान्यांमधल्या कार्यकर्त्यासारखा अव्याहत काम करताना दिसतो. साधारण एक वर्षांपूर्वी, स्वप्नातही न पाहिलेले प्रत्यक्षात घडून आले आणि शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर विधीमंडळ आणि प्रशासकीय कामाची माहिती करुन घेत असतानाच करोनाचा प्रादुर्भाव झाला आणि सर्वांप्रमाणेच त्यांनीही घरातून राज्यशकट हाकला.

अचानकपणे मिळालेल्या राज्याच्या प्रमुखपदाने अजिबात हुरळून न जाता संयमीपणे त्यांनी आपली जबाबदारी आजवर सांभाळली आहेच. शिवाय राज्याचा प्रमुख म्हणून वाट्याला येणारा डामडौल, डेकोरम बाजूला ठेवत अनेकदा त्यांनी आपल्यातल्या मोठेपणाचा प्रत्यय दिला आहे. याचे ताजे उदाहरण औरंगाबादमध्ये शनिवारी दिसून आले.

येथे शहर पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे व्यासपीठावर पोहोछले, तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांच्यासाठी एका आलीशान, सिंहासनासारख्या खुर्चीची व्यवस्था संयोजकांनी केली होती. मात्र, व्यासपीठावरील अन्य सदस्यांना साध्या खुर्च्या देण्यात आल्या होत्याअ. अशी असमानता पाहताच मुख्यमंत्र्यांनी सिंहासनासारख्या खुर्चीवर बसायल नकार दिला. तत्काळ ती आलीशान खुर्ची हटवायला त्यांनी सांगितले. तसेच अन्य सदस्यांनाअ जशा खुर्च्या देण्यात आल्या होत्या, तशीच खुर्ची मागवून मुख्यमंत्री त्यावर स्थानापन्न झाले. मगच हा कार्यक्रम पुढे सुरु झाला.

मुख्यमंत्र्यांच्या या कृतीने उपस्थितांसह अनेक जण भारावून गेले आणि समता, समानतेचा पुरस्कार करणारी मुख्यमंत्र्यांची ही कृती समाजमाध्यमांतूनही व्हायरल झाली. अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ ट्‌वीटरसह फेसबुक व इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.