बीजिंग: विम्बल्डन विजेत्या सिमोना हॅलेपचे चीन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान सोमवारी येथे संपुष्टात आले. दुसऱ्या फेरीतच तिला रशियाच्या एकतेरिनाअ ऍलेक्झांड्रोवाने तिचा 6-2, 6-3 असा दणदणीत पराभव केला.
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या हॅलेपला ऍलेक्झांड्रोवाविरूद्ध फारसा प्रभाव दाखविता आला नाही. तिला सर्व्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत ऍलेक्झांड्रोवाने दोन्ही सेट्समध्ये सर्व्हिसब्रेक मिळविला.
कॅनडाच्या 19 वर्षीय खेळाडूने बेलारुसच्या ऍलियाक्सांद्रा सान्सोविच हिचा पराभव करीत सनसनाटी विजय नोंदविला. तिने हा सामना 6-2, 2-6, 6-1 असा जिंकला. तिची आता एलिसी मर्टन्सबरोबर लढत होणार आहे.