ग्राहकाच्या कागदपत्रांवर विदेशी नागरिकाला सिमकार्ड

पिंपरी  – सिमकार्ड खरेदी करण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करीत दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर बनावट स्वाक्षरी करुन सिमकार्ड खरेदी करून हे सिमकार्ड विदेशी व्यक्तीला वापरायला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघाजणांवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन दत्तात्रय कारंडे (रा. पिंपळे गुरव) असे सिमकार्ड विकणाऱ्या दुकानदाराचे नाव आहे. तर सिमकार्ड वापरणारा शोलाडॉय सॅम्युयल जॉय (वय 44, रा. मूळ नायजेरिया, सध्या रा. रावत) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी, माणिक पांडुरंग वायदडे (वय 38, रा. काटेपूरम चौक, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रोहन कारंडे याचे पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात साई-समर्थ मोबाईल शॉपी नावाचे दुकान आले. या दुकानातून फिर्यादी वायदडे यांनी 2015 साली सिमकार्ड खरेदी केले होते.

त्यासाठी त्यांनी त्यांचे अधारकार्ड, पॅनकार्ड व फोटोच्या झेरॉक्‍स प्रती सिमकार्ड विक्रेते रोहन कारंडे यांना दिल्या होत्या. रोहन याने वायदडे यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करीत स्वत:च्या फायद्यासाठी याच कागदपत्रावर बनावट स्वाक्षरी करुन आणखी एक सिमकार्ड घेतले. व हे सिमकार्ड परदेशी नागरिक असलेल्या शोलाडॉय जॉय याला वापरायला दिले. जॉय याच्यावर कोंडावा पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस ऍक्‍ट नुसार गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.