माळेगावातील रेश्‍माच्या शिक्षणाचा प्रवास सुकर

“डिजिटल प्रभात’च्या माध्यमातून लाखोंपर्यंत पोहचली व्यथा
पेठ : आदिवासी ठाकर समाजातील एक प्रेरणादायी मुलगी- रेश्‍मा जाधव… आपल्या छोट्या भावाला घेऊन शाळेत येते आणि त्याचा सांभाळ करण्याचे कर्तव्य पार पाडत शिक्षणाची आसही पूर्ण करण्यासाठी धडपडते.

या बाबतची बातमी दैनिक “प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली आणि माळेगाव (ता. खेड) येथे जिल्हा परिषदेच्या तिच्या शाळेकडे अनेकांच्या नजरा वळल्या आणि तिच्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला.

“शिक्षणासाठी रेश्‍माने बांधली शाळेतच झोळी’ अशा आशयाची बातमी दैनिक “प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली होती. “डिजिटल प्रभात’च्या माध्यामतून लाखो लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली आणि अनेकांनी प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या रेश्‍मा जाधवला मदतीचा हात पुढे करत तिचा शैक्षणिक प्रवास सुखकर व्हावा यासाठी सायकल, वह्या, स्कुल बॅग आदी वस्तू भेट दिल्या आहेत.

माळेगाव (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आदिवासी ठाकर समाजातील रेश्‍मा रामदास जाधव ही मुलगी चौथीच्या वर्गात शिकत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.