कॉंग्रेस भवनात शुकशुकाट

पुणे – देशाबरोबर राज्यात कॉंग्रेसचे झालेले पानिपत आणि पुणे लोकसभा मतदार संघात झालेला पराभव या सगळ्याचे पडसाद कॉंग्रेस भवनामध्ये पाहायले मिळाले. निवडणुका म्हटले की, कार्यकर्त्यांनी गजबलेल्या कॉंग्रेस भवनामध्ये यंदा मात्र शुकशुकाट दिसत होता.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरवात झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासात कल येण्यास सुरवात झाली. तेव्हा पहिल्या फेरीपासून भाजपचे गिरीश बापट आघाडीवर होते. ती आघाडी शेवटपर्यंत कायम होती. त्यामुळे कॉंग्रेसचा पराभव होणार हे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निश्‍चित झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गजबलेले कॉंग्रेस भवन सकाळपासून शांत होते.

पुण्याच्या राजकारणात कॉंग्रेस भवनाला वेगळे स्थान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील कॉंग्रेसच्या विजयाचे ते साक्षीदार राहिले आहे. अनेक जल्लोष या भवनाने पाहिले आहेत. सुरेश कलमाडी यांच्या विजयानंतर याठिकाणी दिसणारा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष अनेकवेळा पुणेकरांनी अनुभवला आहे. मध्यरात्रीपर्यंत हा जल्लोष सुरू असायचा पण गुरुवारी मात्र हे चित्र वेगळे होते. पुण्याच्या निकालाबाबत कॉंग्रेसला शंका होती. त्यामुळे पुण्यापेक्षा राज्यात किंवा देशात तरी कॉंग्रेस चांगली कामगिरी करेल, असे वाटत होते. त्यामुळे त्या उत्साहाने कार्यकर्ते कॉंग्रेस भवनामध्ये जमा झाले होते. पण त्याचा हा उत्साह फार काळ टिकू शकला नाही. उलट निकाल जसजसे स्पष्ट होत गेले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतला. संध्याकाळी तर अगदी शुकशुकाट होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)