इस्लामाबाद : पाकिस्तानातील पेशावरमध्ये शीख तरुणाची हत्या करण्यात आली आहे.परविंदर सिंग(२५) असे या युवकाचे नाव आहे. भारताने या हत्येचा तीव्र शब्दात निषेद नोंदवला आहे. भारतात नाक खुपसण्यापेक्षा पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची काळजी घ्या, असे भारताने पाकला सुनावले आहे.
तरुणाची हत्या झाल्यानंतर युवकाचा मृतदेह चमकानी पोलिस स्थानकाच्या हद्दीत सापडला होता. या प्रकरणाचा तपास चालू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
परविंदर सिंग यांचे पुढील आठवड्यात लग्न होते. लग्नाच्या तयारीसाठी तो पेशावर येथे गेला होता. तेथेच अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला.
दरम्यान पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चआयुक्तालया समोर शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी निर्दशने केल्याची माहिती मिळते आहे.
k