पुणे: अभिनेता अजय देवगण याच्या तानाजी चित्रपटानंतर सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. तानाजी चित्रपटानं महाराष्ट्रात नाही तर भारतात तानाजी मालुसरे यांचं कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचवलं. याच सिंहगडावरील पिठलं भाकरी, कांदे भजी आणि मटक्यातील दही प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे येणारे पर्यटक फक्त सिंहगड सर करत नाही तर या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतात.
दरम्यान, पुण्याच्या साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे