भारत-दक्षिण कोरियात सहा महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

सेऊल – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर असून या दौऱ्यात भारत आणि दक्षिण कोरियाने सहा महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ज्या मध्ये पायाभूत सुविधांचा विकास, माध्यमे, स्टार्ट अप या क्षेत्रांतील करारांसह आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासंदर्भातील करारांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांची “ब्लू हाउस’ या अध्यक्षीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. ज्यामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा यासह विविध विषयांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, भारताच्या आर्थिक स्थित्यंतरात दक्षिण कोरिया महत्त्वाचा भागीदार आहे. तर, गेल्या आठवड्यातील पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या घटनेबद्दल अध्यक्ष मून यांनी सहवेदना व्यक्त केली. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सहकार्य मजबूत करण्यात दोन्ही देश कटिबद्ध आहेत,’असे मोदी यांनी अध्यक्ष मून यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले.

दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेले करार पुढील प्रमाणे – कोरियन नॅशनल पोलिस एजन्सी आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात करार झाला आहे. तसेच राजकुमारी सुरीरत्ना (राणी हुर व्हांग ओक) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संयुक्त टपाल तिकीटासाठी दोन्ही देशांत करार करण्यात आला आहे. अयोध्येच्या राजकुमारी असलेल्या सुरीरत्ना 1948मध्ये कोरियात गेल्या आणि राजे किम सुरो यांच्याशी विवाहबद्ध झाल्या त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या टपाल तिकीटासाठी करार करण्यात आला.

त्याच बरोबर “कोरियन प्लस’ संस्था कार्यरत ठेवण्यासाठी करार. या संस्थेमार्फत कोरियन कंपन्या भारतात गुंतवणूक करतात. 2016मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये कोरियाचे उद्योग, व्यापार आणि ऊर्जा मंत्रालय, तसेच कोरिया ट्रेड इव्हेन्समेंट अँड प्रमोशन एजन्सीचे (केओटीआरए) प्रतिनिधी आहेत. यावेळी दोन्ही देश स्टार्टअप सहयोगाला चालना देणार आहेत. त्या धर्तीवर भारतामध्ये कोरिया स्टार्टअप सेंटर (केएससी) उभारण्यात येणार आहे. ज्यातून कोरिया आणि भारता मध्ये नविन उद्योगांना चालना मिळू शकेल. भारतातील रस्ते आणि वाहतूक पायाभूत सुविधा प्रकल्पांतील सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच कोरिया एक्‍स्प्रेस वे कॉर्पोरेशन यांच्या सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.