नवी दिल्ली – सध्या जगामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे या वाढत्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे. भारतात देखील सुरुवातीला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. आता तो वाढवून 3 मे पर्यंत करण्यात आला आहे.
दरम्यान, या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व लोक आपआपल्या घरात बंद आहेत. याचा पर्यावरणावर देखील चांगला परिणाम झाला असून, प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे.
Pir Panjal range of mountains is visible from srinagar city on April 23, 2020 in Srinagar.@waseem_andrabi pic.twitter.com/es28Ie83jT
— Waseem Andrabi (@waseem_andrabi) April 23, 2020
सध्या सोशल मीडियावर श्रीनगरचे काही फोटो व्हायरल प्रचंड होत आहेत. मात्र हे फोटो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही पण, या फोटोमध्ये श्रीनगरमधून पीर पंजाल रेंज दिसत आहे. पीर पंजाल रेंज हा आंतरिक हिमालयाच्या भागातील पर्वतांचा समूह आहे. जो हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मिरमध्ये येतो.
Beautiful pictures! https://t.co/ROGAOK7aDJ
— Mayor Junaid Azim Mattu (@Junaid_Mattu) April 23, 2020
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंजाबमधील जालंधरमधून हिमाचलचे पर्वत दिसत असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते. भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपल्या ट्विटर अकाउंटवर हे फोटो शेअर केले होते.