पिंपळे गुरव, (वार्ताहर) – इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे झालेल्या शालेय बॉक्सिंग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी विविध वजनी गटात 5 सुवर्णपदक 7 रौप्यपदक व 1 कांस्यपदक मिळवित उल्लेखनीय संपादन केलेले आहे.
निकाल -19 वर्षाखालील मुली कंसात वजनी गट- ऋतुजा मार्के (48 किलो) प्रथम क्रमांक, अनराधा फुगे (60 किलो) प्रथम क्रमांक, ज्ञानेश्वरी हाके (69 किलो) प्रथम क्रमांक , भक्ती कोरडे (51 किलोग्रॅम) तृतीय क्रमांक.
19 वर्षाखालील मुले- ओम माटे (75 किलो) प्रथम क्रमांक, शुभम देशमुख (85 ते 91 किलो) प्रथम क्रमांक, जतीन काशीद (-46 किलो) द्वितीय क्रमांक, ओम शेटे (46 ते 49 किलो) द्वितीय क्रमांक, कल्याण साबळे (49 ते 52 किलो) द्वितीय क्रमांक,
विकास मंडल (52 ते 56 किलो) द्वितीय क्रमांक, साहिल घावरी (56 ते 60 किलो) द्वितीय क्रमांक, रोहन पारवे (60 ते 64 किलो) द्वितीय क्रमांक, सार्थक शिंदे (64 ते 69 किलो) द्वितीय क्रमांक.
वरील पाच प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची शालेय विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार विलास लांडे यांनी विशेष अभिनंदन करून खेळाडूंना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच संस्थेचे खजिनदार अजित गव्हाणे, सचिव सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांत लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी.कानडे , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे यांनी विशेष अभिनंदन केले.