कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मतदाराबाबत महत्वपूर्ण बदल….

सहा महिन्यांपासून अधिक काळ वास्तव्यास असल्यासही हक्क…. 

पुणे(प्रतिनिधी) – संरक्षण मंत्रालयातर्फे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदाराबाबत महत्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला असून, या बदलानुसार आगामी काळात कॅंटोन्मेंट हद्दीत सहा महिन्यांपासून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या 18 वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला कॅंटोन्मेंट निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. कॅन्टोन्मेंटच्या नागरिकांसाठी हा एक महत्वाचा बदल मानला जातो.

आतापर्यंत कॅंटोन्मेंटच्या अधिकृत रहिवाशांनाच (रेसिडेन्ट) कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार होता. मात्र, संरक्षण मंत्रालयातर्फे कॅन्टोन्मेंट कायद्यात बदल करत सुधारित कॅन्टोन्मेंट कायदा 2020 प्रस्तावित केला आहे. या कायद्यात कॅन्टोन्मेंटमधील मतदराच्या व्याख्येत महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून, प्रस्तावित कायद्यानुसार केवळ मूळ रहिवाशीच नाही तर कॅंटोन्मेंट हद्दीत सहा महिन्यांपासून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या 18 वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला कॅंटोन्मेंट निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.

पुणे, खडकी, देहूरोडसह देशभरातील सर्व कॅंटोन्मेंटमध्ये राहणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या, स्थावर मालमत्तेची मालकी असलेल्या प्रत्येकाला कॅंटोन्मेंटच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार मिळू शकेल. परिसरातील नागरिकांना या प्रस्तावामुळे मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

कॅंटोन्मेंट कायदा 2006 मध्ये अनेक नागरीकेंद्री बदल प्रस्तावित करत, कॅन्टोन्मेंट कायदा 2020 चा मसुदा संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केला असून, त्यावर 16 जूनपर्यंत नागरिकांच्या हरकती-सूचना मागविल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.