नजर करारी, आकाशी भरारी

कलेचे दालन विद्येचे माहेर ।
गाठले हे उन्नतीचे शिखर ।।
होतात येथे स्वप्ने साकार ।
घेणार नाही कधीच माघार ।।

वरील काव्यपंक्‍तींच्या माध्यमातून “द्वारका’ शाळेची ओळख करून दिली तर अतिशयोक्‍ती होणार नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती आंब्रे यांनी या शाळेचा विस्तार अशाच पद्धतीने केलेला आहे. या ज्ञानमंदिराचा पाया रचण्यापासून ते कळसापर्यंतचा प्रवास साधण्यात त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. 2009 मध्ये महाळुंगे (इंगळे) येथे सौ. स्वाती आंब्रे यांच्या करारी नजरेत “द्वारका’ स्कूलची वाटचाल सुरू झाली.

आतापर्यंत वेगवेगळ्या शहरांमध्ये राहण्याची तसेच काम करण्याची सवय असल्यामुळे महाळुंगे सारख्या शहरापासून दूर असलेल्या ग्रामीण भागात काम करणे हे आव्हानात्मक होते. शाळेची नोंदणी प्रक्रिया, सर्व सरकारी कागदपत्रे पूर्तता, शाळेतील विद्यार्थी प्रवेश, शिक्षक नेमणूक, इतर कर्मचारी नेमणूक या सर्वच स्तरांवर काम करणे आवश्‍यक होते. “लहान मुले ही एका मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात आणि या गोळ्याला योग्य आकार देणे ही एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी आहे ‘ असे मॅडमचे मत आहे. लहानपणापासूनच सैनिकी शिस्तीमध्ये संगोपन झाले असल्यामुळे शाळेतही शिस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

ग्रामीण भागात या शाळेची उभारणी करून, तेथील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पुरविण्यासाठी तसेच प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याच्या मुख्य उद्देशाने प्रारंभापासूनच सीबीएसई (उइडए) चा अभ्यासक्रम व विविध प्रायोगिक उपक्रमांची पायाभरणी केली गेली. 2009मध्ये बीजारोपण झालेल्या या संस्थेचा आज कल्पवृक्ष झालेला असून दशपुर्तीपर्यंतची झेप त्यांनी घेतलेली आहे. 2012 मध्ये “द्वारका’ शाळेला सीबीएसईची मान्यता प्राप्त झाली आणि अशा पद्धतीने पुढील प्रगतीचा प्रवास सुरू झाला.

विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास साहित्य अशा विविध विषयांचे संगोपन या ठिकाणी केले जात असून “क्रियाकल्प आधारित शिक्षण’ (अलींर्ळींळीूं इरीशव ङशरीपळपस) या उपक्रमांच्या अंतर्गत हे विषय चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. मुलांची प्रतिभा व वैचारिक दृष्टी सर्वांसमोर आणण्यासाठी विज्ञान प्रदर्शन, विविध विषयांतील स्पर्धा परीक्षा यांचे आयोजन केले जाते. याचबरोबर इयत्ता आठवी, नववी व दहावीसाठी अन्न उत्पादन आणि पाककृती (ऋेव झीेर्वीलींळेप अपव र्उीश्रळपररू अीीीं) हा वेगळ्या प्रकारचा शैक्षणिक उपक्रम राबवला जातो. शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी व शैक्षणिक उन्नतीसाठी “उपचार वर्ग’ (ठशाशवळरश्र उश्ररीीशी) व समुपदेशन या प्रकारचे उपक्रम घेतले जातात.

2017 मध्ये अवंतिका ग्रुपतर्फे मॅडम यांना “अवंतिका डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच पोषक अशा वातावरणात विद्यार्थ्यांच्या आंतरिक कलागुणांनाही वाव दिला जातो. संगीत , नृत्य , चित्रकला , हस्तकला असे विषय येथे शिकविले जातात. विद्यार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या विषयांतर्गत विविध स्पर्धा नेहमीच शाळेत आयोजित केल्या जातात. या शाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील वार्षिक स्नेहसंमेलन. शिक्षक व विद्यार्थी यांच्या कलागुणांच्या देवाण घेवाणीतून साकार होणारे हे स्नेहसंमेलन दरवर्षी मोठ्या थाटामाटात पार पडते. यात शाळेतील सर्वच मुलांना रंगमंचावर आपले सादरीकरण करण्यास वाव मिळावा या गोष्टींसाठी मॅडम विशेष आग्रही असतात.

“इंडिया बजेट प्रायव्हेट स्कूल रॅकिंग’ ने सन्मानित

सौ. स्वाती आंब्रे मॅडमच्या योग्य मार्गदर्शनाखाली शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे याचा पुरावा शाळेने अजुन एक पुरस्कार मिळवून दिलेला आहे. हा पुरस्कार म्हणजे एज्युकेशन वर्ल्ड ही शिक्षणाचा व शिक्षकांचे प्रशिक्षण करणारी संस्था आहे. या संस्थेने “इंडिया बजेट प्रायव्हेट स्कूल रॅकिंग 2020 अवॉर्डससाठी संपूर्ण भारतातून सर्वेक्षण करून पारितोषिक जाहिर केली होती. यामध्ये चाकण परिसरात “द्वारका’ स्कूलची प्रथम क्रमांकाची शाळा म्हणून निवड करण्यात आली.

शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मॅडम आपल्या दृनिश्‍चय स्वभावाने आणि दूरदृष्टीने गेली सतत 11 वर्षे या ज्ञानदानाच्या कार्यात आपल्या प्रगल्भ इच्छाशक्‍तीच्या जोरावर कार्यरत राहून आता एका तप पुर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करीत आहेत.
– संकलन : राजेंद्र सुरसे, आंबेठाण

सेैन्य पार्श्‍वभूमी असलेल्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे आठ वेगवेगळ्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिक्षण झाले. दर दोन वर्षांनी नवीन जागा, नवीन शाळा, नवीन मित्र. याचा एक चांगला अनुभव गाठिशी आहे. उच्च माध्यमिक शिक्षण, पदवी शिक्षण आणि एमबीए पुणे येथून पूर्ण केले. केवळ वयाच्या 21 व्या वर्षी बोत्सवाना विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्‍ती झाली आणि शिक्षक म्हणून वाटचाल सुरू झाली. 1987 मध्ये आर्मी स्कूल खुंदरू (जम्मू – कश्‍मीर) येथे मुख्याध्यापिका म्हणून काम केले. वेगवेगळ्या देशांत, विविध विद्यापीठात काम केल्यानंतर महाळुंगे-इंगळे गावातील “द्वारका’ शाळेचा पायाभरणी करण्याची संधी मिळाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.