India’s Most Wanted Gangster | 13 ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रसिद्ध राजकीय नेते आणि अभिनेता सलमान खान यांचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण मुंबईत खळबळ माजली असून, पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे. या हत्येची जबाबदारी कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली आहे.
India’s Most Wanted Gangster | सलमान खान आणि लॉरेंस बिश्नोई यांच्यातील तणाव
सलमान खान आणि लॉरेंस बिश्नोई गँगमधील वाद नवीन नाही. याच वर्षी लॉरेंस बिश्नोईच्या शूटर्सनी सलमान खान यांच्या घराची रेकी करून गोळीबार केला होता. त्यानंतर सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र देखील मिळाले होते. लॉरेंस बिश्नोई सध्या तुरुंगात आहे, परंतु त्याचे गुन्हेगारी साम्राज्य बाहेरूनच चालवले जात आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या हे याच दहशतीचे उदाहरण आहे.
India’s Most Wanted Gangster | भारताचे टॉप 5 मोस्ट वाँटेड गँगस्टर्स
भारतामध्ये केवळ लॉरेंस बिश्नोईच नाही, तर इतरही अनेक गँगस्टर्स सक्रिय आहेत. यांपैकी पाच सर्वात धोकादायक आणि मोस्ट वांटेड गँगस्टर्सची यादी NIA, CBI आणि इतर एजन्सींनी जाहीर केली आहे.
1. लॉरेंस बिश्नोई
लॉरेंस बिश्नोई सध्या भारताचा सर्वात मोठा गँगस्टर मानला जातो. तो अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगतात आपले पाय घट्ट रोवत आहे. जेलमध्ये असतानाही तो आपल्या गँगद्वारे रंगदारी वसूल करतो आणि ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांची हत्या करवतो.
2. गोल्डी बराड़
लॉरेंस बिश्नोईचा जवळचा साथीदार गोल्डी बराड़ दुसऱ्या क्रमांकावर आहे. सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी बराड़ याचे नाव सिद्धू मूसेवाला हत्याकांडानंतर प्रकाशात आले. या हत्येचा मास्टरमाइंड गोल्डी होता. सध्या गोल्डी बराड़ कॅनडामध्ये लपला आहे आणि त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिस जारी केली आहे.
3. लकी पटियाल (बंबीहा ग्रुप)
लॉरेंस बिश्नोई गँगचा सर्वात मोठा शत्रू बंबीहा ग्रुप आहे. हा ग्रुप दविंदर बंबीहाने सुरू केला होता, परंतु त्याच्या एनकाउंटरनंतर लकी पटियालने ग्रुपची धुरा सांभाळली आहे. लकी पटियाल सध्या आर्मेनियामध्ये आहे आणि त्याच्यावर 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
4. अर्श डल्ला
अर्श डल्ला हा खालिस्तानी गँगस्टर असून, तो खालिस्तान टायगर फोर्स (KTF) चा संस्थापक सदस्य आहे. त्याच्या गँगमध्ये सुमारे 700 पेक्षा जास्त शूटर्स आहेत. सध्या तो कॅनडामध्ये लपला आहे, आणि त्याच्यावर 5 लाखांचे बक्षीस जाहीर आहे.
5. नीरज बवाना
दिल्लीतील एकेकाळचा कुख्यात गँगस्टर नीरज बवाना हा यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचे खरे नाव नीरज सेहरावत असून, तो सध्या तिहार जेलमध्ये आहे. तिथूनच तो आपले क्राइम नेटवर्क चालवत आहे. नीरज बवाना गँग दिल्लीतील सर्वात मोठ्या गँग्सपैकी एक मानली जाते.
भारतामध्ये या गँगस्टर्सने सध्या दहशत माजवली आहे. पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणा त्यांना पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांची गुन्हेगारी साम्राज्ये अद्याप चालूच आहेत.