Sidharth Malhotra | अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. ज्यानंतर चाहत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सध्या सिद्धार्थ आणि कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सिद्धार्थ पापाराझींवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये कियारा डोक्याला हात लावून गाडीमध्ये बसलेली दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचे शर्ट परिधान केले आहे. तेव्हा पापाराझी तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यादरम्यान गाडीच्या मागून सिद्धार्थ येतो आणि पापाराझींवर चिडताना दिसतो.
तो पापाराझींना ‘जरा नीट वागा आणि मागे जा,’ असे सांगतो. सिद्धार्थ मल्होत्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी देखील सिद्धार्थ मल्होत्राचे कौतुक करत आहेत. Sidharth Malhotra |
View this post on Instagram
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी सिद्धार्थ-कियारा आई-बाबा होणार आहेत. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी कियाराने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली होती. Sidharth Malhotra |
हेही वाचा:
मेंढपाळाच्या लेकाची यशाला गवसणी; आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्दीने झाला IPS अधिकारी