कोरोना साईड इफेक्ट! इटलीतील महिलेला कापावी लागली हाताची ‘बोटं’; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं…

रोम (इटली) – गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगभरात धूमाकूळ घातलेला आहे. सध्या कोरोनाबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. परंतु आता कोरोनोबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या साईड इफेक्टमुळे इटलीतील एका महिलेला आपल्या हाताची बोटे कापावी लागली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या महिलेच्या बोटांना गॅंगरीन झाले होते. परिणामी महिलेच्या हाताची बोटे काळे पडली होती. म्हणून या महिलेची बोटे कापावी लागली. रक्त गोठल्यामुळे या महिलेची बोटं पूर्णपणे काळी पडली होती.

86 वर्षीय महिला गेल्यावर्षी कोरोनाच्या विळख्यात सापडली होती. युरोपियन जर्नल ऑफ व्हस्क्युलर अँड एंडोव्हस्क्युलर सर्जरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, कोरोना विषाणूमुळे या महिलेला गॅंगरीन आजार झाला होता. कोरोनामुळे होणारा गॅंगरीन हा रोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे. तसेच यापूर्वीही अनेकदा कोरोना विषाणूचे साईडइफेक्ट जगासमोर आले आहेत.

सध्या देशात आणि जगात कोरोनाचे रुग्न कमी प्रमाणात आढळून येत आहेत. परंतू यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा न बाळगता दक्ष राहण्याची गरज आहे, असे आवाहान वैज्ञानिकांकडून करण्यात आले आहे. तसेच न्यूझीलंड या देशाने कोरोनावर मात केली होती, मात्र या देशात आता कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून या ठिकाणी अधिकची खबरदारी घेतली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.