सिद्धिबाग बनलाय मद्यपींसाठी फेव्हरिट स्पॉट

शहरातील महापालिकेच्या सिध्दीबागेची देखभाल-दुरूस्ती अभावी लागली वाट
मनपा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज होत आहे व्यक्त

कबीर बोबडे
नगर – महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे उद्याने भकास होण्याच्या मार्गावर आहेत. देखभालीअभावी उद्यानातील साहित्य मोडकळीस आलेले आहे. प्रेमीयुगलांचा मुक्त संचार, मद्यपींचे उद्यानात बसून भर दिवसा दारू पिणे याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने सिध्दी बाग मद्यपींसाठी फेव्हरिट स्पॉट बनला आहे. शिवाय, सिद्धी बागे समोर कचऱ्याचा ढीग तयार झालेला आहे. त्यामुळे उद्यानावर करण्यात येणाऱ्या निधीचा अपव्यय होत असल्याची ओरड नागरिकांना मधून होत आहे.

शहराचे प्रमुख उद्यान असलेले सिद्धी बाग सध्याच्या घडीला बकाल होत चालले आहे. काही दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेसाठी सिद्धी बागेतली झाडांच्या रस्त्यावर आलेल्या फांद्या अडथळा ठरु नाही म्हणून झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. या उद्यानात मद्यपी भर दिवसा बसून दारू पितात, गांजा ओढतात. सिद्धी बागेत अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात. मात्र, मनपा प्रशासनाकडून मद्यपी लोकांवर कुठलीही कारवाई केल्या जात नाही. उद्यानाच्या सुरक्षेसाठी नेमून दिलेल्या चौकीदार देखील बऱ्याचदा तिथे हजर नसतो. बागेमध्ये पुरेसे समाधानकारक वातावरण नसल्याने महिलांमध्ये थोडी धाकधूक असल्याचे इथे फिरायला येणाऱ्या महिलांनी सांगितले.

उद्यानाला सुरू किंवा बंद करण्याचा वेळ मोडीत काढून युवक – युवती तारांच्या जाळीतून प्रवेश करतात. शहरातील उद्यानाच्या देखभालीकडे मनपा प्रशासन योग्य खबरदारी न घेतल्याने सिद्धी बाग उद्यानाची दुरवस्था झाली. बागेला असलेले तारेचे कुंपण तुटलेले आहे. शिवाय, माशा भोवतीच्या कारंजा हौदात देखील कचरा पडलेला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडे बहुतांश अकुशल कामगार असल्याने बागांच्या देखभालीसह सुधारणेच्या कामास अडचणी येत आहेत. शहरातील प्रमुख उद्यान असलेल्या या उद्यानाची व्यवस्थित निगा राखली जात नसल्याने उद्यानाची दुरवस्था होत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबीकडे मनपा प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकामधून व्यक्त केल्या जात आहे.

शहरात छोटी-मोठी 52 उद्याने
नगर शहरात महापालिकेची छोटी-मोठी 52 उद्याने आहेत. यातील प्रमुख तीन उद्यानांपैकी सावेडीच्या टीव्ही सेंटरजवळील गंगा उद्यान आणि बालिकाश्रम रस्त्यावरील महालक्ष्मी उद्यान खासगीकरणातून चालवले जाते. असे असली तरी गंगा उद्यानाला महिन्याला मनपा प्रशासन 80 हजार रुपये देते. तर महालक्ष्मी उद्यानाच्या देखभालीचा खर्च मनपा करते. तर सिध्दी बागेचा देखभाल खर्च मनपा करते, तरीही उद्याणाची दुरवस्था होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)