“मरजावां’मध्ये सिद्धार्थ-ताराचा रोमांस

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या आगामी “मरजावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. यात त्याच्यासोबत तारा सुतारिया, रितेश देशमुख आणि रकुल प्रीत सिंह यासारखे स्टार कलाकारांची मोठी फौज आहे. सिद्धार्थ मल्होत्रा प्रथमच अभिनेत्री तारा सुतारियासोबत रोमांस करताना झळकणार आहे.

“मरजावा’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात सर्व कलाकार व्यस्त आहेत. या व्यस्त शेड्यूलमध्येही सिद्धार्थ आपल्या पर्फेक्‍ट बॉडीसाठी कसरत करत असल्याचे दिसून येत आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम हॅंडलवर एक वर्क आउट सेशनचा फोटो शेअर केला आहे.

दरम्यान, सिद्धार्थ हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या “शेरशाह’ या बायॉपिकमध्ये काम करत आहे. या चित्रपटाचे कथानक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. बत्रा हे कारगिल युद्धातील महानायक होते. त्यांनी युद्धावेळी आपल्या सहका-यांना मुलांप्रमाणे मानले होते. त्यानंतर 16 हजार फूट उंचीवर शत्रुंचा सामना करताना गोळी लावल्याने त्यांना वीर मरण आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.