सिद्धार्थ शिरोळे यांचा ‘निर्धारनामा’

पुणे -“शिवाजीनगर मतदार संघाच्या विकासाला गेल्या काही वर्षांत एक दिशा मिळाली असून, त्याला योग्य गतिमान वाटचाल देण्याच्या दृष्टीने “निर्धारनामा’ तयार केला आहे. नागरिकांची मतं, अपेक्षा आणि समस्यांची माहिती घेऊन तसेच युवकांचे प्रश्‍न या सर्व घटकांवर आधारित हा “निर्धारनामा’ असून, शिवाजीनगर मतदार संघासाठी खऱ्या अर्थाने हा “रोडमॅप’ ठरेल, असा माझा विश्‍वास आहे,’ असे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवाजीनगर मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदार संघाच्या विकासाचा रोडमॅप “निर्धारनामा’च्या स्वरूपात तयार केला. त्याचे प्रकाशन खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, रिपाइंचे परशुराम वाडेकर, नगरसेवक शंकर पवार यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी खासदार बापट म्हणाले, “शिवाजीनगर मतदारसंघ गॅस सिलिंडरमुक्त करण्यासाठीचा प्रकल्प आम्ही राबवित आहोत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोपासून विविध उपाययोजना देखील करण्यात येत आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांचा निर्धारनामा हा पक्षाच्या धोरणांना अनुसरून असून आम्ही सर्व त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रयत्न करू.’
संजय काकडे म्हणाले, “सिद्धार्थ शिरोळे यांना राजकीय वारसा असला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके आहेत.’ अनिल शिरोळे म्हणाले, “शिवाजीनगर मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे.’

निर्धारनाम्यातील ठळक मुद्दे
– मेट्रो, समान पाणीपुरवठा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, वाहतूक, आधुनिक कचरा व्यवस्थापन, प्रदूषणावर मात करण्यासंबंधीच्या उपाययोजना करणे
– उद्योगांना हातभार लावावा यासाठीचे कार्यक्रम, खडकी कॅन्टोन्मेंटचा विकास, उर्जा व्यवस्थापन, पदपथांवरील अतिक्रमण, ओढ्यांच्या सुरक्षितता, महिला सुरक्षा
– शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या कामास गती देण्याबरोबरच 2021 पर्यंत ते पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा, पीएमपी  बसमार्ग व वेळापत्रक यांची फेरआखणी आणि इलक्‍ट्रिक बससेवा उपलब्ध करणे
– शहरातील मोठ्या उद्योजकांबरोबर लघु आयटी उद्योजकांना सवलती मिळाव्यात आणि घरगुती दराने वीजबिल आकारणीसाठी पाठपुरावा खडकी कॅन्टोन्मेंटच्या विकासाठी आता राज्य शासनाचा निधी मिळण्यास प्रारंभ झाला असून या परिसरातील सुविधा अधिक बळकट करण्यासाठी नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)