भर पावसात सिद्धार्थ शिरोळे यांची प्रचारसांगता

पुणे  – शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ युवकांनी भर पावसात दुचाकीवर सांगता रॅली काढली होती. कामगार पुतळ्यापासून या रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रस्ता, गुडलक चौक, फर्गसन रस्ता, ज्ञानेश्‍वर पादुका चौक, हनुमान नगर, गोखलेनगर, दीप बंगला चौक, खडकी गाव, खडकी बाजार, आंबेडकर चौक, औंध रस्ता, ब्रेमन चौक, औंध गाव या मार्गाने ही रॅली पार पडली.

शहरात पाऊस असतानाही युवक कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह या वेळी प्रकर्षाने जाणवला. यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, रिपाइंचे परशुराम वाडेकर, शिवसेनेचे आनंद मंजाळकर, नगरसेविका स्वाती लोखंडे, ज्योत्स्ना एकबोटे, आदित्य माळवे, राजश्री काळे, सोनाली लांडगे, अर्चना मुसळे, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर आदी उपस्थित होते.

या बरोबरच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मुस्लीम समाज मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी मुस्लीम समाजाने शिरोळे यांना जाहीर पाठिंबा दिला. मेळाव्याचे आयोजन सैफ सय्यद यांनी केले होते. खासदार अनिल शिरोळे, नगरसेवक विवेक शिंदे, स्वाती लोखंडे, फेरोज कच्छी, संतोष डांगे, नजीर शेख, भैय्या पटेल, सलीम मौलाना, अली सय्यद, मलंग सय्यद, तात्या धाकतोडे, फारूक शेख, ललित काकडे, अरबाज बागवान, राज कोळी, मीरा सय्यद यावेळी उपस्थित होते.

याशिवाय शुक्रवारी नगरसेविका आणि महिला-बालकल्याण विकास मित्र परिवाराच्या अध्यक्षा आणि नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्यातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात सिद्धार्थ शिरोळे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. या वेळी “प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)