पुणे – आपल्या मतदार संघातील सामान्यातील सामान्य नागरिकांच्या भेटी घेत, त्यांच्या अपेक्षा जाणून घेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांचा प्रचार सुरू आहे.
गुरुवारी चिखलवाडी, रेल्वे लाईन, ओरिएंट कॉम्प्लेक्स या ठिकाणी पदयात्रेतून शिरोळे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्या भागातील अनेक प्रश्नांवर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी नगरसेवक विजय शेवाळे, अर्चना मुसळे, बंडू ढोरे, स्वाती लोखंडे, माजी महापौर सुरेश शेवाळे, अनिल भिसे, गणेश नायकरे, मधुकर मुसळे, सचिन वाडेकर, स्वामी नवले, उत्तम बहिरट, सोनाली भोसले, रिटा उपाध्याय, सुभाष बहिरट, सदाशिव मोरे, धनंजय दरे, अनिल तिळवणकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आयटी, अभियांत्रिकी व्यावसायिकांचा सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिंबा
तरुण आणि विचारी व्यक्तिमत्त्व असल्याने आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीच्या शिवाजीनगर मतदार संघाच्या अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना पाठिंबा देत असल्याची ग्वाही शहरातील आयटी आणि अभियांत्रिकी व्यावसायिकांनी दिली. रविवारी शिरोळे यांच्या कार्यालयात आयटी आणि अभियांत्रिकी व्यावसायिकांनी त्यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. नवी शिकलेली पिढी राजकारणामध्ये आपले मत व्यक्त करत त्यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहे, ही कौतुकाची बाब असल्याचे शिरोळे यावेळी म्हणाले.