“बिग बॉस 14’चा होस्ट सलमानबरोबर सिद्धार्थ शुक्‍लाही

बिग बॉस 13 चा स्पर्धक आणि विजेता सिद्धार्थ शुक्‍ला जेंव्हापासून चर्चेत आला, तेंव्हापासून त्याचे ग्लॅमर वाढायला लागले. 13 वा सिझन संपल्यानंतरही सिद्धार्थ शुक्‍लाच्या नावाची चर्चा कित्येक दिवस सुरू होती. आता “बिग बॉस’च्या पुढच्या सिझनमध्ये सलमान खानबरोबर सिद्धार्थ देखील या रिऍलिटी शोचा होस्ट असणार आहे, असे ऐकायला मिळाले आहे.

त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्या इतकी जास्त आहे, की त्याच्या सहभागासाठी त्याला कोहोस्ट म्हणून सहभागी करून घेण्याचे ठरले आहे. अर्थात त्याचा सहभाग अगदी मर्यादित आणि एका विशेष भागापुरताच मर्यादित असणार आहे. “करारा जवाब’ असे त्याच्या सेगमेंटचे नाव असणार आहे. “बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांच्या वर्तनाचे तो घराबाहेर बसून परिक्षण करणार आहे आणि शेवटी आपल्या निरीक्षणाच्या आधारे तो स्पर्धकांचे मूल्यांकनही करणार आहे.

अर्थात यासंदर्भातील नियोजन सलमानशी चर्चा केल्यानंतरच फायनल होणार आहे. गेल्या वर्षभरात गुगलवर सर्वाधिक सर्च सिद्धार्थ शुक्‍लाचा झाल होता. त्यामुळे त्याला ” द टाईम-मोस्ट डिजायरेबल 20 मेन ऑन टिव्ही 2019’मध्येही निवडले गेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.