पुणे – विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता चारच दिवस शिल्लक राहिले असून, जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये शिरोळे यांनी मतदार संघामध्ये पदयात्रा, प्रचारफेऱ्या याबरोबर विविध समाजाचे मेळावे, मंदिरे, गुरूद्वारा आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत त्या त्या भागातील नागरिकांशी संवाद साधण्यावर भर देत आहेत.
मंगळवारी शिवाजीनगरमधील पुलाची वाडी, खंडोजीबाबा चौक, खिलारे वसाहत या ठिकाणी पदयात्रेद्वारे त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या. यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, नगरसेविका नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, दीपक पोटे, श्याम सातपुते, शिरीष आपटे, स्वाती लोखंडे, अतुल दीघे, अनिरुद्ध पायगुडे, जालिंदरनाथ मोरे, रवींद्र मोरे, भूषण देवकर, मोहन दिघे, राम दिघे, अतुल दिघे, दत्ता खंडाळे, जितू मंडोरा यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
विनायक निम्हण यांनी घेतली भेट
माजी आमदार विनायक निम्हण आणि त्यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक सनी यांनी शिरोळे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. पिता-पुत्रांनी सोमवारीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिरोळे यांच्या कार्यालयात माजी खासदार अनिल शिरोळे हे देखील उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी निम्हण यांनी दिली.